बँकेत नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने जेवणासाठी पापा पँचोदा ढाबा या हॉटेलात जाऊन चिकन करी मागवली. सोबत इतर पदार्थ पण मागवले होते. जेवण जेवण्यास सुरुवात करताच ग्राहकाला चिकन करीमध्ये मेलेला उंदीर आढळला. या प्रकरणी ग्राहकाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी चौकशी करून रेस्टॉरंटचा व्यवस्थापक आणि दोन स्वयंपाकींना अटक केली.
रविवारी रात्री जेवत असताना ग्राहकाला चिकन करीमध्ये मृत उंदीर आढळला. चिकन करी मागवली असताना त्यात मेलेला उंदीर बघून ग्राहक एकदम चक्रावला. त्याने लगेच रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यांनी घडल्या प्रकाराची दखल घेऊन लगेच माफी मागितली. पण मेलेला उंदीर बघण्याआधीच ग्राहकाने थोडी चिकन करी खाल्ली होती. यामुळे जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने ग्राहकाची तब्येत बिघडली आणि त्याला डॉक्टरांकडे जावे लागले. अखेर घडल्या प्रकाराविषयी त्याने पोलिसांकडे तक्रार केली.
या तक्रारीच्या आधारे रेस्टॉरंटचा व्यवस्थापक आणि दोन स्वयंपाकींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्यवस्थापक आणि स्वयंपाकी यांच्याविरुद्ध कलम 272 (विकलेल्या अन्नात भेसळ) आणि कलम 336 (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments