वैकुंठवासी. मृदूंगमणी हरी भक्त पारायण श्री. दत्तोबा महाराज शेटे यांचे 16 वे पुण्यस्मरण व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
प्रतिनिधी रेखा भेगडे: तळेगाव दाभाडे : कैलासवासी हरी भक्त पारायण श्री. दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठान यांच्या वतीने संप्रदायिक व शैक्षणिक क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणिजणांचा सत्कार प्रत्येक वर्षी केला जातो. यावर्षी देखील सोमवार दिनांक 28/8/2023 या दिवशी हा कार्यक्रम होत आहे.भजन सम्राट हरी भक्त पारायण श्री. नंदकुमार दत्तोबा शेटे महाराज (महाराष्ट्र राज्य भजन कला गौरव पुरस्कृत )हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत.या कार्यक्रमासाठी हरी भक्त पारायण नितीन महाराज मोरे,मा. पै. महेशदादा लांडगे (आमदार, भोसरी विधानसभा ), श्रीमती अस्विनीताई लक्ष्मण जगताप (आमदार, चिंचवड विधानसभा ), सौ. माया उर्फ उषाताई ढोरे (मा. महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ),मा. श्री. संजय (बाळा )भेगडे (मा. राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) इत्यादी, तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्व मान्यवर यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुख्य आयोजक श्री. नंदकुमार शेटे महाराज यांनी मावळवाशियांना सोमवार दिनांक 28 /8/2023 रोजी होण्याऱ्या कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी विनंती केली आहे.

0 Comments