-->

Ads

मुंबई - पुणे हायवेवर अपघाताचा थरार, ताबा सुटल्याने कंटेनर थेट पिकअपवर कोसळला; दबल्याने एकाचा मृत्यू

Pune Lonawala Accident: जुन्या मुंबई - पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ झालेल्या अपघातात पिकअप चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून, या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



पुणे (लोणावळा) : जुन्या मुंबई - पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ झालेल्या अपघातात पिकअप चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून, या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात आज पहाटे सात ते साडेसातच्या दरम्यान झाला आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने एत कंटेनर भरधाव वेगात जात होता. अंडा पॉईंट येथील उतार अन् वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने दोन पिकअप टेम्पो गाड्यांना जोरदार धडक दिली आणि कंटेनर पलटी झाला. यावेळी एक पिकअप गाडी कंटेनरच्या खाली गेली. यामध्ये पिकअप चालकाचा गाडीमध्ये अडकल्याने मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले आहेत.

जखमींना दोघांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची देवदूत यंत्रणा आणि खोपोली येथील सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यू करत बाहेर काढत उपचारासाठी दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस, आय आर बी, यांच्यासह विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत पिकप गाडी आणि आतमध्ये अडकलेला चालक यांना काढण्याचे कार्य सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी खंडाळा घाटात ऑईल टँकर पलटी झाल्याने त्यात ऑईल गळती झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. ती घटना लोकांच्या मनात ताजी असताना झालेला हा अपघात देखील भीषण आहे.


Post a Comment

0 Comments