-->

Ads

बारा वर्षांचा नातू वाट हरवला, पुण्याहून मुंबईला पोहचला, आजीला फक्त 'दादर' शब्द आठवत होता, अखेर...

Grandma Found lost Grandson : वयस्कर आजी नातू घरी परतण्याची वाट पाहत होती. दोन दिवस असेच उलटून गेले, पण आकाश घरी परतला नाही. आजीने आपल्या परीने त्याला ४ दिवस शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही.

पुणे : मित्राच्या वाढदिवसाला जातो, असे आजीला सांगून घराबाहेर पडलेल्या १२ वर्षीय नातवाला मुंबईतून परत आणण्यात यश आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे त्याला परत आणता आले. पिंपरी चिंचवड परिसरातून आजी आणि नातवाच्या नात्याला जोपासणारी घटना समोर आली आहे. आकाश ओव्हाळ असे परत आणलेल्या नातवाचे नाव आहे. त्याच्या परत येण्याने आजीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश ओव्हाळ हा आपल्या आजी आणि लहान बहिणीसोबत भोसरी या ठिकाणी रहायला आहे. चार वर्षांपूर्वी आकाशाच्या आईचे आजाराने निधन झाले आहे, वडील दारूच्या आहारी आकंठ बुडल्यामुळे घरी लक्ष देणे दुर्लभ आहे. त्यामुळे ७५ वर्षांची आजी सिग्नलला भिक्षा मागून मुलांचे पालनपोषण करीत आहे.

मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे असे सांगून आकाशने आजीकडून हट्टाने १० रुपये घेतले आणि पुणे - लोणावळा लोकलमध्ये बसला. त्याला निश्चित कुठे उतरायचे होते हे सांगता आले नाही, परंतु तो शेवटच्या लोणावळा या स्थानकावर उतरला, तेथे त्याला अनोळखी मनुष्याने मुंबईला जाणाऱ्या एका एक्स्प्रेस गाडीमध्ये बळेच बसवले.

मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे असे सांगून आकाशने आजीकडून हट्टाने १० रुपये घेतले आणि पुणे - लोणावळा लोकलमध्ये बसला. त्याला निश्चित कुठे उतरायचे होते हे सांगता आले नाही, परंतु तो शेवटच्या लोणावळा या स्थानकावर उतरला, तेथे त्याला अनोळखी मनुष्याने मुंबईला जाणाऱ्या एका एक्स्प्रेस गाडीमध्ये बळेच बसवले.

इकडे वयस्कर आजी तो घरी परतण्याची वाट पाहत राहिली होती. दोन दिवस असेच उलटून गेले, पण आकाश घरी परतला नाही. आजीने आपल्या परीने त्याला ४ दिवस शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही.

अखेर आजीने गोष्ट आपल्या परिचित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते फादर बन्यामीन काळे आणि डेव्हिड काळे यांच्या कानावर घातली. दोघांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आकाशला शोधून काढण्याचा चंग बांधला. त्यावेळी आकाशला घरा शेजारील राहणाऱ्या आपल्या आजीची मैत्रीण सोनिया भालेराव यांचा फोन नंबर सापडला.

आकाशने मुंबईमध्ये असलेल्या बाल सुधारगृहातून त्या आजीला फोन करून सुधारगृहाचे नाव सांगितले. पण आजीला दादर या शिवाय काहीच लक्षात राहिले नाही. आजीने ही माहिती फादर काळे यांना सांगितली. काळे यांनी आलेल्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो स्विच ऑफ लागला. फादर बन्यामीन काळे आणि डेव्हिड काळे यांनी थेट दादर गाठले. आकाशची आजी आणि त्यांच्या मैत्रिणीने देखील कसेबसे मुंबई गाठले.

फादर काळे आणि डेव्हिड काळे यांनी दादर मध्ये अनेक ठिकाणी बालसुधारगृहाबाबत चौकशी केली पण शोध लागला नाही, तेथून काही माहिती मिळताच माटुंगा गाठले, तेथे देखील चौकशी केली असता आकाशचा पत्ता लागला नाही. दि बेहरामजी जिजीभाय होम फॉर दि चिल्ड्रन (माटुंगा, पूर्व) या ठिकाणी विचारपूस केली असता, आकाशच्या वयाची मुले कदाचित माहिम मधील बालसुधारगृहात असतील असे सांगण्यात आले. माहिम येथील डेव्हिड ससून चिल्ड्रन्स होम येथे चौकशी केली तेव्हा आकाश तेथेच आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली.

तेथील इन्चार्ज तुषार सरांना भेटून आकाशबाबत सांगितले, त्यांनी त्वरित आकाशची भेट घडवून आणली, पण ताबा देण्यास नकार दिला, नियमाप्रमाणे फक्त रक्ताच्या नातेसंबंधातील व्यक्तीलाच कागदोपत्री खात्री करूनच ताबा देता येतो असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे काळे यांनी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रफुल्ल असुर्लेकर यांना मदतीसाठी बोलावले, त्यांनी देखील तुषार सरांना विनंती केली, पण आकाशची आजी श्रीमती इंदुमती जगताप यांना प्रत्यक्ष आणल्याशिवाय ताबा देता येणार नाही असे सांगितले. असुर्लेकर यांच्या गाडीतून डोंगरी येथे आजीला आणण्यात आले, सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून चाईल्ड वेल्फेअर कमिटी, मुंबई येथे सादर करण्यात आले. कागदपत्रांची पडताळणी करून कमिटीने डिस्चार्ज ऑर्डर दिले. या कामी आशा सोनावणे यांनी सहकार्य केले.







Post a Comment

0 Comments