-->

Ads

जन्मदाता बापच वाईट नजरेने बघायचा; लेकीने उचललं टोकाचं पाऊल, दिली भयानक शिक्षा

 

वडील सतत वाईट नजरेने पाहायचे आणि स्पर्श करायला यायचे, म्हणून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं मुलीने सांगितलं.





जांजगीर चांपा, 22 जून : आपलं काही चुकलं की आई-वडील आपल्याला धपाटे देतात किंवा शब्दांचा मार देतात. परंतु छत्तीसगडमध्ये मात्र मुलीनेच वडिलांना दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. यात त्यांचा मृत्यू झाला. वडील सतत वाईट नजरेने पाहायचे आणि स्पर्श करायला यायचे, म्हणून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं मुलीने सांगितलं.

तिल्दा नेवारा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बिलाडी गावात ही घटना घडली. मृताच्या मुलानेच याबाबत पोलिसांत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिलं असता वडील बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मृताला 9 मुली आणि एक मुलगा आहे. पोलिसांनी घटनेबाबत कुटुंबियांकडे चौकशी केली असता मृताची तिसरी मुलगी कल्पना भारती घाबरू लागली. तिची संशयास्पद अवस्था पाहून महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान मुलीने आपला गुन्हा कबूल केला.

दरम्यान, मृताच्या पत्नीचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर, या हत्येप्रकरणी कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवून कल्पना भारती हिला अटक करण्यात आली. तसेच तिने वडिलांना मारण्यासाठी वापरलेला दांडकाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.


Post a Comment

0 Comments