-->

Ads

खळबळजनक! मुंबईतील बड्या शाळेत 'स्पेशल चाइल्ड'चा मृत्यू; कारण वाचून बसेल धक्का

 मुंबईतील बड्या शाळेत स्पेशल चाइल्डचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

विजय वंजारा/मुंबई, 23 जून : नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. आपल्या मुलांना आपल्यापासून दूर ठेवणं म्हणजे पालकांच्या जीवाला तसा घोरच असतो. पण मुलांच्या भविष्यासाठी त्यांना शाळेत तर पाठवायचंच असतं. अशाच एका दाम्पत्याने आपल्या मुलाला शाळेत पाठवलं. पण शाळेत त्याचा मृत्यू झाला. मुंबईतील बड्या शाळेतील ही धक्कादायक घटना आहे. यामागील कारणही धक्कादायक आहे.

शार्दुल आरोलकर असं या मुलाचं नाव आहे. 14 वर्षांचा शार्दुल एक सामान्य मुलगा नव्हता तर तो स्पेशल चाइल्ड होता. गोरेगावच्या यशोधाम शाळेत तो स्विमिंग क्लाससाठी जात होता. पण तिथं त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचं कारण असं काही सर्वांनाच धक्का बसला आहे.

शार्दुलचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. ज्यावेळी शार्दुल स्विमिंग करत होता तेव्हा त्याचे प्रशिक्षकही त्याच्यासोबत होते. तरी तो पाण्यात बुडाला. त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला आहे.

शार्दुलचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. ज्यावेळी शार्दुल स्विमिंग करत होता तेव्हा त्याचे प्रशिक्षकही त्याच्यासोबत होते. तरी तो पाण्यात बुडाला. त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला आहे.

Post a Comment

0 Comments