मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात 1 जण ठार, तर 2 जण जखमी झाले. ही घटना खेडला घाट परिसरात आज पहाटे घडली. मृत व जखमींची नावे अजून कळली नाही.
यासंबंधीच्या माहितीनुसार, लोणावळ्याहून मुंबईकडे एक ट्रक भरधाव जात होता. अंडा पॉइंटच्या एका कठीण वळणावर या ट्रकच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने 2 पिकअप व्हॅनला धडक मारली. ट्रकचा वेग इतका होता की, या वाहनांना धडकल्यानंतर ट्रक रस्त्यावरच उलटला. या अपघातात पिकअप व्हॅनचा चालक व्हॅनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत. जखमीत एका शाळकरी मुलाचा समावेश आहे.
महामार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर व खराब झालेले वाहने रस्त्यावरून हटविण्याचे काम केले जात आहे.
0 Comments