-->

Ads

अमित शाह चंद्रकांतदादांवर नाराज, बाळासाहेबांबद्दलच्या वक्तव्यावरून खडसावले

 

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने आता पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.





मुंबई, 12 एप्रिल : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने आता पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी चंद्रकात पाटील यांना खडसावलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बाळासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यावर अमित शाहांनी नाराजी व्यक्त केलीय. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिवसैनिकसुद्धा बाबरी मशिद पाडताना होते असं सांगितलं. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अद्यापही टीका केली जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. त्यांच्या शब्दांचा विपर्यास केला गेला. बाळासाहेबांची भूमिका आम्हाला मान्य असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.


बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटलं की, अनेक दिवस जेल मध्ये राहून ते अनेक भाषा शिकलेत, येणारी पिढी हे पाहतेय, त्यांनी भाषा सुधारावी, इतकंच आम्ही म्हणू शकतो, यातून काय येणाऱ्या पिढीला संस्कार देणार हा प्रश्न आहे. पुन्हा पुन्हा वक्तव्य संजय राऊत करतायत. ते आंतरराष्ट्रीय नेते आहेत, मात्र सलग शिवराळ भाषेत टीका करणे आणि राज्याची संस्कृती धुळीस मिळवणे योग्य नाही. सत्ता गेल्याने ते रिकामे आहेत, आणि बावचळले आहे

Post a Comment

0 Comments