-->

Ads

विधीवत अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी परतलं आजोबांचं 'भूत'मुंबई : जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने सहाजिक लोकांना वाईट वाटतं. बऱ्याचदा लोकांना मनातून वाटत असतं की आपली जवळची व्यक्ती उठावी आणि परत यावी. कुठेतरी हे देखील माहित असतं की असं होणं शक्य नाही. आपण फक्त याचा विचारच करु शकतो. पण असं असलं तरी पाटणामध्ये हे खरोखर घडलं आहे. ही घटना ऐकून सर्वांना धक्का बसला आहे.

बिहारची राजधानी पाटणामधील या अजब घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर या घरातील एक वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा घरच्यांनी अंत्यसंस्कार देखील केला. पण तिच व्यक्ती तीन दिवसांनी जिवंत परतली होती. ज्यामुळे ज्या व्यक्तीचा अंत्यविधी केली, ती व्यक्ती कोण होती असा प्रश्न सगळ्यांना पडला.


नक्की काय आणि कसं घडलं?

देवन राय आठवड्याभरापूर्वी बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी बराच शोध घेतला. पण त्यांचा ठावठिकाणा सापडला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दिघा पोलीस ठाण्यात देवन राय बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. दोन दिवसांनंतर गंगा नदीच्या किनाऱ्यावर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला.


पोलिसांनी घाईगडबडीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हा मृतदेह देवन राय यांचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी तो देवन यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केला. कुटुंबीयांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. अंत्यविधी झाल्यानंतर तीन दिवसांनी देवन राय जिवंत परतले. त्यामुळे परिसरात खळबळ माजली.

अनेकांना आधी वाटलं की त्यांचं भूत परतलं आहे. पण ते खरोखर परतले होते.

देवन राय यांनी सांगितले की काही लोकांनी त्यांनी कामाच्या शोधात दूरवर नेले होते. तेव्हा देवन यांनी त्यांच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली आणि घरी परतले, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्यामुळे देवन राय यांच्या कुटुंबीयांनी कोणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्याला या प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचं सांगत डीएसपींनी हात वर केले. देवन राय यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली. त्यानं राय यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. 

Post a Comment

0 Comments