-->

Ads

चक्क विहिरीतुन निघाले ATM मशीन, पोलीसही झाले अवाक्... नेमकं काय घडलं? VIDEO

 

एका धक्कादायक प्रकाराने पोलिसही अवाक् झाले आहेत.

  दौसा, 22 एप्रिल : राजस्थानच्या दौसा पोलिसांनी एटीएम लुटणाऱ्या एका नराधमाला अटक केली आहे. सीकर जिल्ह्यातील गवंडी गावातील रहिवासी तेजपाल सिंग उर्फ ​​कालू असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेजपाल सिंगवर सीकर, झुंझुनू, अजमेरसह अनेक जिल्ह्यांमध्ये एकूण 21 गुन्हे दाखल आहेत.

  नेमकं काय घडलं -

  आरोपी तेजपाल याला 16 नोव्हेंबर रोजी दौसा जिल्ह्यातील सिकराई शहरात पोलिसांनी एटीएम दरोड्याप्रकरणी अटक केली होती. यावेळी आरोपीची चौकशी केली असता धक्काकाय माहिती समोर आली. एटीएम चोरी केल्यावर ते त्यातील पैसे काढून घेतात आणि नंतर एटीएम विहिरीत टाकतात. त्यामुळे पोलिसांनी सीकरच्या नीमका पोलीस स्टेशन परिसरात एका विहिरीत शोधमोहीम राबवली आणि अनेक तासांच्या प्रयत्नानंतर एटीएम बाहेर काढले.


  एकापाठोपाठ एक एटीएम विहिरीतून बाहेर पडू लागल्यावर विहिरीच एटीएम बाहेर काढत असल्याचा भास झाला. या विहिरीतून पोलिसांना 2 एटीएम सापडले असून त्यापैकी एक सिकराई येथून चोरीला गेले होते. त्याचबरोबर इतर एटीएमबाबतही चौकशी सुरू आहे.

  सध्या पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या एटीएम दरोडा प्रकरणात यापूर्वीही पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्याचवेळी तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. एटीएम चोरीच्या इतर घटनाही चौकशीअंती उघड होण्याची शक्यता असून, नीम पोलीस ठाणे हद्दीतील अन्य विहिरींमध्येही अन्य एटीएम असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  मानपूरचे डीएसपी दीपक मीणा यांनी सांगितले की, एटीएम प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी हा मुख्य आरोपी असून इतर घटनाही उघड होण्यासाठी त्याची सतत चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

  Post a Comment

  0 Comments