-->

Ads

जनावरांमध्ये लंम्पी रोग आढळ्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करा

 पंचायत समिती पुसद !

 डॉ . गणेश वानोळे पशुसंवर्धनअधिकारी 

प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

 3D NEWS पुसद

पुसदःतालुक्यातील गावांतील जनावरांमध्ये लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे सदृश्य लक्षणे आढळुन आली आहेत , ज्यामध्ये जनावाराना अंगावर गाठी येणे , पायावर सुज असणे व ताप हे प्रमुख लक्षणे दिसतात . आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत असे लक्षणे असलेले जानवर आढळल्यास त्वरीत नजीकच्या पशुवैद्यकिय रुग्णालयात उपचार करून घ्यावेत तसेच गाव पातळीवर खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी , असे आवाहन डॉ . गणेश वानोळे पशुसंवर्धन अधिकारी व गजानन पिल्लेवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच , सचिव यांना देण्यात आलेल्या एका पत्राद्वारे केले आहे . 

सद्या राजस्थान मध्ये लंपी रोगाने थैमान घातले असून हजारो जनावरे या रोगामुळे मृत्युमुखी पडत आहे . परिणामी या रोगाची लक्षणे आपल्या जिल्ह्यातील काही गावांमध्ये आढळून येत असल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे . लंम्पी रोगाबाबत माहिती देण्यात आली आहे की , जनावरांच्या अंगावर गाठी येणे , सुरुवातीस भरपूर ताप , डोळ्यातुन नाकातून चिकट स्त्राव , चारा पाणी खाने कमी करणे , काही जनावरांत पायावर सुज येऊन लंगडने , असे लंपी रोगाचे लक्षणं आहेत . सदर आजार हा संसर्गाने पसरत असल्यामुळे आजारी जनावरे हे निरोगी जनावारा पासुन वेगळे बांधण्यात यावे , आजारी जनावारांना चारा व पाण्याची वेगळी व्यवस्था करण्यात यावी तसेच चराई करीता पाठवु नये . गावात जनावरांचा बाजार , प्रदर्शनी व जानवर एकत्र आणन्यास प्रतीबंध घालावा , आजारी जनावरांचा बाहेरुन गावात प्रवेश किवा दुसऱ्या गावात संचार बंद करावा सदर आजाराचा प्रसार हा डास , माश्या , गोचीड , चिलटे , दुषित चारा व पाणी ई . पासुन होत असल्याने गावात योग्य खबरदारी घ्यावी तसेच जनावराच्या गोठ्यात ( sodium hypochlorite ) या औषधाची फवारणी करून घ्यावी , मृत जनवारांची योग्य विल्हेवाट लावणे बाबत पशुपालकांना सूचना करावी , या प्रमाणे काळजी घेतल्यास रोग आटोक्यात आणन्यास मदत होइल तरीही पशुसंवर्धन विभागास सहकार्य करुन वेळेत रोग नियंत्रणास मदत करावी असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी व गटविकास अधिकारी पुसद यांच्या वतीने करण्यात आले आहे .


Post a Comment

0 Comments