पुसद : देशातील वनांची सेवा करताना सुमारे जवळपास १४०० वन कर्मचारी शहीद झाले आहेत . राष्ट्रीय वन शहीद दिनानिमित्त काळी दौ . वनपरिक्षेत्र अंतर्गत कासोळा बीट येथे पुसद वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक सोनकुसरे ( भावसे ) यांच्या प्रमुख उपस्थित शहीद वन कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेट क र 3D न्यूज पुसद
११ सप्टेंबर हा राष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे . या निमित्त काळी दौ . वनपरिक्षेत्र अंतर्गत कासोळा बीट येथे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने वन शहिदांना दोन मीनीट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
तसेच रोटरी क्लब पुसद चे अध्यक्ष गजेंद्र निकम यांच्या वतीने २५० वृक्ष भेट देण्यात आले होते त्या वृक्षाची श्रमदानातून घनवन पद्धतीने लागवड करण्यात आली .
यावेळी बोलताना उपवनसंरक्षक अशोक सोनकुसरे ( भावसे ) म्हणाले की , “ देशाच्या दुर्गम डोंगरी कानाकोपऱ्यात निसर्गाचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी प्राण दिले . राष्ट्रीय संपत्तीचे जतन करत असता शहीद झालेल्या वन कर्मचाऱ्यांचे आजच्या दिनी आठवण करणे व वन कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे "
यावेळी रोटरी क्लब चे अॅड . रमेश पाटील , स्वप्नील चिंतामणी , राम फुके , विजय ठाकरे तसेच डॉ . मकरंद गुज़र ( एसीएफ ) साईनाथ नरोड ( एसीएफ ) प्रविण राऊत ( आरएओ ) विशाल झांबरे ( आरएओ ) कुरोडे ( आरएओ ) कुणाल लिमकर ( आरएओ ) शेरे ( आरओ ) पि.पि. गंगाखेडे ( आरओ ) गोपाल जिरोणकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक कार्यालयीन संघटना शाखा पुसद तथा सहसचिव महाराष्ट्र राज्य , संतोष बदुकले राऊंड ऑफिसर गुंज यांनी विशेष परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला , तर मान्यवरांचे आभारपि.पि.गंगाखेडे ( आरओ ) यांनी मानले . यावेळी वनरक्षक रवि राठोड , वनरक्षक मुनेश्वर वनरक्षक चिरंगे , वनरक्षक केंद्रे , वनरक्षक गजानन शेळके तसेच महिला वनरक्षक मनिषा मुसळे राऊत , वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी , वन कर्मचारी व वन मजूर , व वृक्षप्रेमी अदी उपस्थित होते .
0 Comments