-->

Ads

▪️रस्त्यावर मुरूम टाकल्याने रस्त्यावरून चालणे देखील झाले कठीण

▪️माती मिश्रीत मुरूम रस्त्यावर टाकल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य 

▪️ग्रामपंचायत च्या गलथान कारभाराने ग्रामस्थ ञस्त



फुलसावंगी/प्रतिनिधीः संजय जाधव 

    फुलसावंगी ग्रामपंचायत ने जि कामे पावसाळ्या पुर्वी करायला पाहिजे होती त्या कामाचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्याने त्याचा ञास हा येथील सर्व सामान्य जनतेला भोगावा लागत असल्याने येथील ग्रामविकास पॕनल व गावातील नागरिकांनी दि.१७ अॉगष्ट रोजी ग्रामपंचायत फुलसावंगी च्या सरपंचास निवेदन देवून रस्त्यावर टाकण्यात आलेला माती मिश्रीत मुरूम काढून चुरी टाकावी व रस्ता वाहतूकीस सुरळीत करून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.विशेष म्हणजे सदरील रस्ता हा गावातील मुख्य बाजारपेठतून जातो,या रस्त्यावर सतत वाहतूक असते.शाळेतील लहान मुले तसेच वृद्ध व्यक्ती याच मुख्य रस्त्यानेच ये-जा करत असतात.खुप मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते.सध्या स्थितीत या रस्त्यावरून पायी चालणे देखील कठीण होऊन बसले आहे.ग्रामपंचायतीच्या वतीने याच रस्त्यावर काही दिवसापुर्वी माती मिश्रीत मुरूम टाकन्यात आला होता.त्यामुळे रस्ता तर व्यवस्थित झालाच नाही उलट जास्तच प्रमाणात खराब होऊन बसला.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ग्रामपंचायत चा पाणी आडवा पाणी जिरवा हा तर प्रयोग नाही ना अस आता फुलसावंगी येथील जनतेतून बोलल्या जात आहे. त्यामुळे तात्काळ रस्ता व्यवस्थित करून द्यावा अन्यथा दोन ते चार दिवसात निवेदनाची योग्य दखल दखल न घेतल्यास आनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा ईशारा विजय महाजन,शमशेर लाला,अमर दळवे,अजय देशपांडे,डॉ.इरफाण कुंदन,आरीफ लाला,विजय पाटील,नासीर खान,शेख.मझर,मुख्तार पठाण,शेख.फारूख,

शमीम कुंदन,शशिकांत नाईक विजय शिंदे,यांच्यासह गावकर्यानी दिला.

Post a Comment

0 Comments