सालाबादप्रमाणे यंदाही अंबरनाथ शहरातील शिवसेना शहर शाखेतर्फे आयोजित केला जाणारा भव्य "दहीहंडी उत्सव" छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केला आहे. आयोजक शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी बालगोपाल श्रीकृष्ण व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली. तब्बल १,११,०००/- रुपयांची पारितोषिक वितरण यंदा शिवसेना शहर शाखेतर्फे पथकांना देण्यात येणार आहेत. सकाळ पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन मंडळे यांची भजन व सायंकाळी "लोकधारा महाराष्ट्राची" असे अनेक कार्यक्रम पार पडत आहेत. आता पर्यंत तब्बल ३० पेक्षा जास्त गोविंदा पथकांनी सलामी थर लावले. सकाळ पासून अंबरनाथ शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्षांतील मान्यवर, पोलिस व पत्रकार बांधव व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
याप्रसंगी शहर शाखेचे शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
0 Comments