-->

Ads

Instagram वर मैत्री अल्पवयीन मुलीला पडली महागात; धमकी देत 10 जणांनी केलं धक्कादायक कृत्य

 

वाचून संताप येईल, इतकी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षांच्या मुलीवर तब्बल दहा जणांनी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. (rape on minor) या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना कर्जत तालुक्यात घडली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पीडित मुलीसोबत मैत्री करण्यात आली होती. त्यानंतर तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी या मुलीला दिली. यानंतर तिच्यासोबत हे संतापजनक कृत्य केले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयितांना अटक केली आहे. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या घटनेमुळे देशातील मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra Crime) ही घटना घडली आहे.

कर्जत तालुक्यातील एका मुलीचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट होतं. तिच्यासोबत शिकणाऱ्या मुलांनी तिच्याशी इन्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर काहींनी या मुलीसोबत चुकीचं अश्लिल कृत्य केलं. तिला कपडे काढून दाखवायला सांगितले. असे करताना मुलीच्या फोटोचं रेकॉर्डिंगही त्यांनी केले आणि हे रेकॉर्डिंग इतरांमध्ये व्हायरल करण्यात आले. यानंतर तुझे फोटो व्हायरल करू अशी धमकी दिली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पीडितेने हा सर्व प्रकार पोलिसांत सांगितला. यानंतर पोलिसांनीही तत्काळ कारवाई करत गौरकामत गावातील आठ जण आणि शिरसे, जंभिवली गावातील प्रत्येक एक, असे एकूण दहा जणांना याप्रकरणी ताब्यात घेतलं. या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे.

Post a Comment

0 Comments