सिलिंडर स्फोट होऊन वडील व मुलगाचा अंत वेंगुर्ला वायंगणी येथील घटना
वेंगुर्ला वायंगणी बागायतवाडी येथील वसंत गणेश फटनाईक याच्या राहत्या घरी आज सकाळी 11 च्या सुमारास सिलिंडर स्फोट होऊन यामध्ये वडील व मुलगा आगीच्या भक्ष्यस्थानी गेले
या घटनेनंतर घटनास्थळी वेंगुर्ला नगर परिषद अग्निशमन बंब व कुडाळ एम आय डी सी अग्निशमन दलाचे बंब तसेच स्थानिकांच्या मदतीने आग विझवली यामध्ये वडील वसंत गणेश फटनाईक 70 व मूलगा गणेश वसंत फटनाईक 29 याचा दुर्देवी अंत झाला त्याची पत्नी मनीषा वसंत फटनाईक या मासेविक्रीसाठी गेल्याने बचावली या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस , तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले
0 Comments