-->

Ads

काळाचौकी येथून 3 महिन्याच्या बाळाचे अपहरण


                 मुंबई : काल दिनांक ३०/११/२०२१ रोजी फिर्यादी नामे सौ. सपना बजरंग मगदूम, वय 36 वर्ष, धंदा- गृहिणी, रा.ठि. रूम नंबर 105, पहिला माळा, संघर्ष सदन, फेरबंदर मुंबई यांनी काळाचौकी पोलीस ठाणे येथे समक्ष दिलेल्या तक्रारी वरून गु.र.क्र. ४३९/२०२१, कलम ३२८, ३६३, ३४ भा.दं.वि. अन्वये नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे पती हे कॅफेमध्ये खाजगी नोकरीस आहेत.


नमुद गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की,  तक्रारदार महिला ह्या आज दिनांक ३०/११/२०२१ रोजी १२:१५ ते १२:५५ वाजेच्या दरम्यान घरामध्ये एकट्याच होत्या व तीन महिने वयाची लहान मुलगी कॉटवर झोपलेली होती. त्यावेळी एक अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाची अनोळखी महीला जुन्या मोबाईलच्या बदल्यांमध्ये कपडे ठेवण्याची बास्केट विकण्यासाठी आली असता, फिर्यादी यांनी त्यांच्याकडे असलेले जूने मोबाईल देऊन प्लास्टिकची बास्केट घेण्याकरिता घरात जुने मोबाईल आणण्यासाठी आत मधील रूममध्ये गेल्या असता सदर अनोळखी महिलेने फिर्यादी यांच्या पाठीमागुन जाऊन फिर्यादी यांच्या नाकाला गुंगी आणणारे औषध लावून त्यांना बेशुद्ध करून कॉटवर ठेवलेली ३ महिने १५ दिवस वयाच्या मुलीचे अपहरण करून घेऊन गेली आहे. सदर बाबत उपरोक्त गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


अपहरण झालेल्या मुलीचे नाव :- 


नाव :- कु. वेदा बजरंग मगदूम, 

वय :- 3 महिने 15 दिवस,

वर्ण :- गोरा  


कक्ष-४ कडून नमुद गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments