रॉंग साईडला पार्क असलेल्या कार चा दरवाजा अचानक उघडन्यात आल्याने, त्याच वेळी रॉग साईडनेच बुलेट राईड करत जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झालाय. राम बाळासाहेब बांगल या 24 वर्षाच्या तरुणाचा या अपघातात मृत्यू झालाय. राम बांगल हा आपला चुलत भाऊ किशोर राजन बांगल यांच्या सोबत रॉग साईडने बुलेट स्वारी करून जात होता. त्याच दरम्यान रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पार्क केलेल्या सेलेरियो कार मध्ये बसलेल्या व्यक्तीने मागे पुढे न पाहता अचानक कारचा दरवाजा उघडल्याने राम बागल हा कारच्या दरवाज्याला धडकून खाली पडला. त्यानंतर त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या आयसर ट्रक चालकाच्या चाका खाली येऊन रामचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दिघी पोलिसांनी किशोर राजेंद्र बांगल, सुरज जगन्नाथ घुले, सुमित कालिदास पराडे आणि एका अज्ञात आयसर ट्रक चालका विरोधात दिघी पोलिसांत गुन्हा दाखल केलाय.
0 Comments