धुळे महानगरपालिकेने 13 कोटी रुपयांचे एलईडी लाईट खरेदी करून धुळे शहर प्रकाशमय करण्याचे टेंडर गुजरात येथील वल्लभ इलेक्ट्रॉनिक कंपनीला देण्यात आले होते, मात्र यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी आरोप करीत सांगितले की, 11 हजार 700 लाइट लावण्यात आल्याचा दावा धुळे महानगरपालिकेने केला आहे. मात्र धुळे शहरात 13 हजार पोल आहे, मग अजूनही शहरातील निम्म्याहून अधिक भागात अंधार का..? धुळे मनपाचे ने लावलेले 11 हजार 700 लाईट कुठे गेले..? तसेच 400 रुपयांचे लाईट 4 हजार रुपयात घेतलाच कसा..? असा आरोप करत भारतीय जनता पक्षाने धुळे महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार केला आहे याचे उत्तर द्या, असे म्हणत आज धुळे महानगर पालिकेच्या आवारात जवाब दो आंदोलन करण्यात आले.
बाईट: रणजीत राजे भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शहर जिल्हाध्यक्ष)
0 Comments