-->

Ads

औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे वतीने साहसी वीरांचा सत्कार


"काम आसान तो सब करते है ,

मुस्किल तू काम कर ,

मरनेके बाद भी जींदा रहे ,

ऐसा तू नाम कर "

                    अशाच प्रकारचे प्रत्यय उमरखेडवाशियांना मागिल आठवडयात अनुभवास आले.

दिनांक 28 सप्टेंबर रोजी अति पावसाने हाहाकार माजवले असताना जिल्ह्यातील सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले.याच दिवशी सकाळी 7.30 वा चे दरम्यान नांदेडवरून नागपूर कडे जाणारी हिरकणी बसचे चालकाने उमरखेड जवळिल दहागाव जवळिल नाल्याचे पुलावरून पाणी असताना  बस पाण्यातून काढण्याचा आततायीपणा केला.व पुलावरिल रस्त्याची दिशा लक्षात न आल्याने बस पुलाचे खाली उतरून पाण्याचे प्रवाहात वाहून गेली.या दरम्यान पूर पाहणार्‍या बघ्यांनी एकच गलका करून कोणी "" वाहून गेलीरे ""सांगण्यात मग्न तर कोणी व्हिडीओ काढण्यात मग्न होते.परंतु याही परिस्थितीत संवेदनशिल मनाचा एक जीगरबाज 17/18 वर्षाचा नवतरूण संकेत कदम हा आपल्या जीवाची पर्वा न करताच पुलाखाली पडलेल्या बसकडे पुराचे पाण्यातून धाव घेत असलेला व्हिडिओ चे चित्रीकरणात सर्वांना पाहायला मिळाला.यावरून या मुलाचे अंगी असलेली भूतदया व स्वतःचे जीव धोक्यात टाकून दुसर्‍याचे जीव वाचवण्याची तळमळ औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे डोळयात भरली.

तसेच महागाव तालुक्यातील वाकान गावचा एक 30 वर्षाचा तरूण उमरखेड ला आपले मामाकडे पाहूना म्हणून आलेल्या अविनाश सवाई राठोड या धाडसी तरूणाने आपले जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली व बस मध्ये वाहून गेलेल्या ईसमापैकी दोन प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यशस्वी झाला .खरेतर बाहेर गावचा पाहूना चोर मारत नसतो.परंतु त्यालाही खोटे ठरवत अविनाश हा कठीण प्रसंगात उमरखेड साठी देवदूतच ठरला अशी सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे.

या धाडसी तरूणांचे पाठीवरून शाब्बासकीची थाप कोणी तरी दिली पाहीजे ही बाब हेरून उमरखेड येथील औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने आज दिनांक 2 ऑक्टोबर गांधी  व लाल बहादूर शास्त्री यांच्या  जयंती औचित्य साधून सेवाव्रताचे दिवशी या धाडसी तरूंनांना बर्थडे गार्डनवर बोलावून त्यांचे कार्याची स्मृती उमरखेडवाशियांना सदैव प्रेरणा देत राहो म्हणून एक शौर्य वृक्ष या नावाने वडाचे झाड लावण्यात आले व त्यांचे शाल व वृक्ष भेट व उमरखेड शौर्य पुरस्कार प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .या सोबतच दहागाव येथील तरूणांनी देखील जोखीम पत्करून प्रवाशांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेउन आपले धाडसी प्रवृतीचे दर्शन उमरखेड वाशियांचे नजरेत आणून दिल्याने त्यांना देखील प्रशस्तीपत्र देण्यात आले.या मध्ये अविनाश राठोड,संकेत रघुनाथ कदम, सुनील देवानंद जाधव, सुरेश नारायण दवणे, विजय माधव कावडे, धनंजय पांडुरंग मुनेश्वर,नितेश पांडुरंग मुनेश्वर, धुरपत लिंबाजी नरवाडे, रवी सदाशिव धुळे,राजु देवानंद जाधव, विशाल रवींद्र कापुरे,मारुती मधुकर शिंदे, किरण दादाराव मुनेश्वर,सचिन सुनील मुनेश्वर,दिनेश किसनराव कदम,या तरूणांचा समावेश होता

या प्रसंगी माजी आमदार विजयरावजी खडसे व जि प  सदस्य  चितांगरावजी कदम सर यांनी धाडसी विरांचे कार्याचा समाजाने आदर्श घ्यावा व ज्यांचे मन तरूण आहेत ते वयाच्या शंभराव्या वर्षी देखील दुसऱ्यासाठी कार्य करण्याची तडफ जागृत ठेवतात असे गुणगौरव करणाऱ्या  भावोद्गाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी समितीचे अध्यक्ष दिलीप भंडारे यांनी औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे कार्याची प्रस्तावना विषद केली.या धाडसी तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी समितीचे मार्गदर्शक वसंत जाधव ,भारत कुळकर्णी सर ,कोषाध्यक्ष वैभव कोडगिरवार, संतोषभाउ गव्हाळे व सचिव प्रकाश शेळके ,सदस्य विरेंद्र खंदारे .मा.अध्यक्ष विजय चौधरी ,शुभम माने व देवहरी पवार  व ईतर नागरिक हजर होते.

सर्व धाडसी शूरविरांचे कार्याला मानाचा मुजरा

👏👏👏👏👏👏👏👏👏

औदुंबर वृक्ष संवर्धन सेवा समिती उमरखेड

Post a Comment

0 Comments