-->

Ads

Tokyo Olympics : भारताने इतिहास घडवला, नीरज चोप्राला गोल्ड मेडल

 टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भारताने इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गोल्ड मेडल पटकावलं आहे.


    टोकयो, 7 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भारताने इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गोल्ड मेडल पटकावलं आहे. नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला.  नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरज चोप्राच्या जवळपासही आला नाही. नीरजचा एकट्याचा थ्रो 87 मीटरच्या पुढे गेला. चेक रिपब्लिकच्या जाकुब वैडेलीचचा थ्रो 86.67 मीटर आणि वितेस्लाव वेसलीचा थ्रो 85.44 मीटर एवढा गेला, त्यामुळे त्यांना अनुक्रमे सिल्व्हर आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं.  प्राथमिक फेरीत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रानं 86.65 मीटर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला होता.

    भारताला एथलेटिक्समध्ये याआधी एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतरानं हुकलं होतं. हा दुष्काळ नीरज  यंदा संपवेल अशी देशाला आशा होती, आणि नीरजनेही देशाचं स्वप्न पूर्ण केलं. यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड मेडल मिळवलं होतं.

    टोकयो ऑलिम्पिकमधलं भारताचं हे पहिलंच गोल्ड मेडल आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीसह भारताच्या खात्यात यंदा 7 मेडल झाली आहेत.



    Post a Comment

    0 Comments