-->

Ads

उमरखेड येथे स्वातंत्र्य दिनी जिव्हाळा संस्थे द्वारा कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा

कोरोना आपत्ती काळातील अभूतपूर्व कार्याचा गौरव


ता.प्रतिनिधी :- संजय जाधव 

१५ ऑगस्ट २०२१ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपल्या उमरखेड विभागात तसेच तालुक्यात महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, पंचायतराज विभाग, तालुका पत्रकार संघ  इत्यादी विभागांनी कोरोना आपती काळात कोविड १९ विष्णूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी आपापल्या विभागा माध्यमातून कर्तव्यामध्ये अत्युच्य, उलेखनीय कर्तव्य परायणता, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता ह्याचा परिचय देऊन शासकीय मदत व योजनांची माहिती सामान्य नागरिकान पर्यंत पोहचवण्याचे कार्य सह्द्य्पणे व प्रामणिक पणे पार पाडले आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहोरात्र महेनत घेतली त्या करीता  इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड यांच्या वतीने “कोरोना योद्धा सन्मान” सन्मानपत्र देऊन १५ ऑगस्ट २०२१ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय उमरखेड येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात उमरखेड विभागाचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड अनुराग जैन, तहसीलदार उमरखेड आनंद देऊळगावकर, पोलीस निरीक्षक उमरखेड आनंदजी मुकुंद वागतकर, मुख्याधिकारी न.पा उमरखेड चारुदत्त इंगोले, गटविकास अधिकारी प.स. उमरखेड प्रविणकुमार वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक उत्तरवार उपजिल्हा रूग्णालय उमरखेड रमेश मांडण, तालुका आरोग्य  अधिकारी उमरखेड किशोर कपाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरखेड संदीप गाडे, व दैनिक वृतपत्र वार्ताहर संघ, उमरखेड  या सर्व अधिकारी मान्यवरांना सुरेख सन्मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन संस्थे च्या वतीने उमरखेड व महागाव विधानसभा क्षेत्रा चे आमदार नामदेवराव ससाणे, उमरखेड विभागाचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड,  जि. प. सदस्य चितांगराव कदम, प.स उमरखेड सभापती प्रज्ञानंद खडसे, जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल मादावार, या सर्व मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात केलेल्या अभूतपूर्व कार्याच्घा गौरव  करण्यात आला आहे.  या दिमाखदार सन्मान सोहळ्याचे वड्डे सर यांनी संचालन केले व आभार मानले या सोहळ्या प्रसंगी उमरखेड शहरातील व तालूक्यातील अनेक मान्यवर, सामजिक संघटना, तहसील मधील सर्व कर्मचारी, पत्रकार बांधव, सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. व जिव्हाळा संस्थे चे रोहित अलमुलवार, मुकेश फाटे पाटील, चंदन जाधव व विजय राठोड उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments