-->

Ads

वातंत्र्यदिनी पाटबंधारे विभागासमोर करणार बोंबा बोंब आंदोलन- अध्यक्ष राजू मुळीक


  पिंगळी तलावातील तसेच तलावाच्या भराव्यावरील काटेरी झाडे-झुडपे,काढण्यासाठी संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्राहक प्रबोधन समितीमार्फत दि.27 जुलै 2020 रोजी निवेदन दिले होते,मात्र पाटबंधारे विभागाने या गोष्टीकडे कानाडोळा केल्याने ग्राहक प्रबोधन समिती आता आक्रमक झाली असून माण-खटावचे अध्यक्ष राजू मुळीक यांनी स्वातंत्र्यदिनी पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर वाघमोडेवाडी, मोरेमळा, दहिवडी व गोंदवले गावातील ग्रामस्थांना सोबत घेत बोंबाबोब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटिशकालीन पिंगळी तलावातील व तलावाच्या भराव्यावरील काटेरी झाडे झुडपे यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता हा भरावा पोकळ होऊन तलावाच अस्तित्व धोक्यात येऊ शकते परिणामी गोंदवले, वाघमोडेवाडी,मोरेमळा,पिंगळी, दहिवडी आदी गावांना फार मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, हा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्राहक प्रबोधन समितीमार्फत माण-खटावचे अध्यक्ष राजू मुळीक यांनी निवेदनाद्वारे सदर झाडे व झुडपे काढण्याचा निवेदन दिले होते.मात्र पाटबंधारे विभागाने या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करत अजून कोणतीच कार्यवाही न केल्याने ग्राहक प्रबोधन समिती आता आक्रमक झाली असून. परिणामी राजू मुळीक यांनी स्वातंत्र्यदिनी पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर गोंदवले, वाघमोडेवाडी, पिंगळी तसेच मोरेमळा दहिवडी येथील ग्रामस्थांना सोबत घेत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे.

Post a Comment

0 Comments