-->

Ads

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार तरुणाची दादागिरी- बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलं...


तरुणाची दादागिरी- बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलं...कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार पोलिस अधिका:यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

विना मास्क बाईक स्वारास थांबविण्याच्या प्रयत्न बाईक स्वाराने पोलिस अधिका:याला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या घटनेत पोलिस अधिकारी  औदुंबर म्हस्के यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाईक स्वार तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


                             

ब्रेक द चेन अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली आठ ठिकाणी दररोज नाकाबंदी केली जाते. विना कारण फिरणा:या आणि मास्क न लावणा:यांच्या विरोधात कारवाई केली जाते. तसेच त्यांना अॅण्टीजेन टेस्टसाठी पाठविले जात आहे. कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा चौकात बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी औदुंबर म्हस्के त्यांच्या कर्मचारी पथकासोबत कर्तव्य बजावित होते. विनाकारण फिरणारे आणि मास्क न लावणा:यांच्या विरोधात कारवाई सुरु होती. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास विना मास्क बाईक स्वार पोलिसांना येताना दिसला. पोलिस अधिकारी म्हस्के यांनी त्या बाईक स्वाराला थांबविण्याच्या प्रयत्न केला. त्यांना न जुमानता या बाईक स्वाराने पोलिस अधिकारी म्हस्के यांना रस्त्यावर फरफटत लांबवर घेऊन गेला. या घटनेचाला म्हस्के यांच्या डोळ्य़ासह हातापायाला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात पोलिस घेऊन गेले. त्याठिकाणी डॉक्टर नसल्याने अन्य खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी मुजोर बाईक स्वार नितीन गायकवाड याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वाडेघरचा राहणारा आहे. तो पानटपरी चालक आहे .तो विना मास्क फिरत होता. पोलिस त्यांची अॅण्टीजेन टेस्ट करणार आहेत. या भितीने त्याने पोलिस अधिका:यास रस्त्यावर फरफटत नेले. या घटनेचे प्रत्यक्ष दर्शी गणोश व्यवहारे यांनी सांगितले की, ही घटना त्यांनी डोळ्य़ादेखल पाहिली. यात पोलिसांची काही चूक नाही. ते कर्तव्य बजावित असताना घडली. ही घटना पाहून आम्ही काही तरुणांच्या मदतीने जखमी पोलिस अधिका:यास रुग्णालयात नेले.


मात्र या बाबत पोलिसांनी उघड पणे न बोलता पोलिसां कडून सहकार्य कराचे आव्हान केले जात आहे 

Post a Comment

0 Comments