-->

Ads

सांगलीत अतिवृष्टीने रस्त्यांवर 16 कोटींचे खड्डे

सांगली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली आहे. पूल वाहून गेले. बहुतांश रस्त्यांवर प्रचंड मोठे खड्डे पडले. रस्त्याचे भराव वाहून गेले. अवजड वाहने गेल्याने रस्त्यांची चाळण झाली. अनेक रस्ते दोन ते तीन दिवस पाण्याखाली राहिले. त्यानंतर वाहतूक सुरू झाली आणि रस्त्यांवरील डांबरी वाहून गेली. प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्गांना दणका बसला. हे साऱ्या नुकसानाची बांधकाम विभागाने सविस्तर सर्व्हे केला असून प्राथमिक अंदाजानुसार या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी किमान 16 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

कोरोना संकटकाळात जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून निधी मिळालेला नाही. राज्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यात आता या रस्त्यांच्या डागडुजीसाठी निधीची उपलब्धता कशी होणार, हा मोठा प्रश्‍न समोर आला आहे. जिल्हा परिषदेकडे या कामासाठी एक रुपयाचाही निधी नाही. त्यामुळे या पंचनाम्यासह निधी मागणीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. तेथून निधी आल्यानंतर डागडुजीचे काम सुरु केले जाईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान, या खड्ड्यांमुळे अपघात टाळण्यासाठी प्राथमिक मलपट्टीचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत रस्ते खराब झाले आहेत, त्या ठिकाणी ग्रामपंचायतींनी आपल्या निधीतून किमान मुरूम टाकावा, यासाठी सूचना दिल्या जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments