अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावातील दोन वर्षीय मुलाच्या पोटावर अंधश्रद्धेपोटी उपचार म्हणून गरम चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलाची प्रकृती गंभीर असून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावातील दिवेश अखंडे या दोन वर्षांच्या मुलाचे मागील दोन दिवसांपासून पोट फुगले होते. यावेळी या मुलाला रुग्णालयात उपचारासाठी न घेउन जाता घरच्यांनी त्याच्या पोटावर गरम सळईचे चटके दिले. त्यामुळे मुलाची प्रकृती आणखी खालावली त्यानंतर त्याला उपचारासाठी अचलपूर येथील रुग्णालयात नेले होते.
आजाराचा सामना करावा लागतो. आदिवासी हे या रोगावर उपचार म्हणून लहान बालकांच्या पोटावर गरम चटके देतात. त्याला आदिवासी डंबा असे म्हणतात. असाच धक्कादायक प्रकार दोन महिन्यापूर्वी उघडकीस आला होता. त्यानंतर शासनाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यात आला. तरीही पुन्हा असा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मेळघाटसारख्या दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि फोफावलेली अंधश्रद्धा यामुळे दिवसेंदिवस असे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

0 Comments