-->

Ads

मित्राच्या डोळ्यांदेखत तरुणीला उचलून नेलं, 2 नराधमांनी केला बलात्कार

मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला उचलून नेत दोन अज्ञात नराधमांनी बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला आहे



औरंगाबाद, 06 ऑगस्ट : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असलं तरी यादरम्यान गुन्ह्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आताही बलात्काराची धक्कादायक घटना औरंगाबादमधून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला उचलून नेत दोन अज्ञात नराधमांनी बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. भर दिवसा असा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगसीमाता गडाजवळील डोंगरातील ही धक्कादायक घटना आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर जाण्यासाठी परवाणगी नाही आहे. अशात कोरोनाच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी पिकनिक स्पॉट आणि पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात आली आहे. तरीही आताची तरुणाई नियम मोडत फिरण्यासाठी बाहेर पडते. अशात तरुणी तिच्या मित्रांसोबत भांगसीमाता गडाजवळील डोंगरात फिरण्यासाठी गेली असता ही भयानक घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे.
पीडित तरुणी तिच्या मित्रांसमोर फिरायला गेली होती. यावेळी काही अज्ञात तरुण तिथे आले आणि त्यांनी सगळ्यांना मारहाण करत मित्रांसमोरून उचलून नेत तरुणीवर बलात्कार केला. यावेळी तरुणीला देखील मारहाण करण्यात आल्याची माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे. आरोपी नराधमांनी तरुणीला जवळच्या खड्ड्यात नेलं. तेव्हा मुलगी प्रचंड विकळाली. गयावया करत हात जोडले. पण, नराधानाने तिचं काहीही न ऐकता तिच्यावर अत्याचार केले

दरम्यान, दोन्ही आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. ही खळबळजनक घटना सायंकाळी साडेसहा वाजता भागतीमाता गडाच्या जंगलात घडली. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौक परिसरातील 20 वर्षीय तरुणीचा वडगाव कोल्हाटी इथल्या दिनेश मोरे नावाचा मित्र आहे. ते दोघे 4 ऑगस्टला दुचाकीने (क्र. एमएच
20481) भांगसीमाता गडावर फिरायला गेले होते. तेथे एका ठिकाणी गप्पा मारत असताना सायंकाळी साडेसहा वाजता दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी काहीही विचारपूस करता सरळ दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तरुणीला तिच्या मित्रासमोर बाजूच्या खड्ड्यामध्ये नेत जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला.
या प्रकरणी दैलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते मात्र तो लघुशनकेची थाप मारत पसार झाला. तर मुख्य आरोपीचा पोलीस तपास करत आहेत. घटना घडल्यानंतर पीडित तरुणीला घटनास्थळी सोडून आरोपी नराधमांनी पळ काढला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नराधमांचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments