- अंबरनाथ व बदलापूर शहरातील व्यापाऱ्यांची संयुक्त मागणी
उस्मान शाह, ( अंबरनाथ )
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन सारखा निर्णय घेतला, याला संपूर्ण व्यापारी वर्गाने शंभर टक्के सहकार्य केले, परंतु सध्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पालिका प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांवर जबरदस्तीच्या लॉकडाऊन लादला आहे, जो अत्यंत अन्यायकारक आहे,
म्हणून 19 जुलै नंतर हा जबरदस्तीचा लॉकडाऊन रद्द करावा अन्यथा दुकानदारांवर आत्महत्येची वेळ येईल, असे मत आज अंबरनाथ व बदलापूर शहरातील व्यप्याऱ्यांच्या संयुक्त बैठकीत व्यक्त करण्यात आले.
दररोज हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर फिरत असताना केवळ दुकाने बंद करून कोरोनाचा फैलाव थांबलेला नाही, हे सिद्ध झाले असतांना उगाच व्यापाऱ्यांवर पुन्हा जबरदस्तीचा लॉकडाऊन लादण्यात येऊ नये, अशी मागणी दोन्ही शहरातील व्यापाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे.
![]() |
| LIVE |





0 Comments