-->

Ads

आनंदाची बातमी! लवकरच मिळणार मेड इन इंडिया लस, ह्यमुन ट्रायलला झाली सुरुवात

कंपनीने सांगितले आहे की, ZYCoV-D ही लस प्लाझ्मिड डीएनए लस, प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासामध्ये सुरक्षित मानली गेली आहे


नवी दिल्ली, 15 जुलै : जगभरातील सर्व देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. दोन भारतीय कंपन्याही या शर्यतीत सामिल झाल्या आहेत. यातच आता भारतीय औषधी कंपनी जायदस कॅडिलाने (Zydus Cadilla) बुधवारी सांगितले की त्यांनी संभाव्य कोरोना लसीसाठी मानवी चाचणीला (Human Trial) सुरू केल्या आहेत. कंपनीने सांगितले आहे की, ZYCoV-D ही लस प्लाझ्मिड डीएनए लस, प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासामध्ये सुरक्षित मानली गेली आहे. यापूर्वी, या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रतिकारशक्ती आणि प्रतिकारशक्ती चाचण्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
याआधी मॉडर्नना (Moderna) या अमेरिकन कंपनीच्या लशीनं पहिली चाचणी यशस्वी पार केली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले परिणाम दिसून आले. मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे याचे कोणत्याही रुग्णांवर साइट इफेक्ट दिसून आले नाही आहेत.

Post a Comment

0 Comments