-->

Ads


अंबरनाथमध्ये १० दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप !
अंबरनाथ नगरपरिषदेच्यावतीने विसर्जनासाठी चोख व्यवस्था...!
नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर यांनी  प्रत्यक्ष उपस्थित राहून केली पाहणी


अंबरनाथ : 

अंबरनाथ : सार्वजनिक मंडळ तसेच १० दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी अंबरनाथ नगरपरिषदेच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. प्रामुख्याने मंडप, विद्युत रोषणाई, अग्निशमन यंत्रणा, पोलिस बंदोबस्त यांबरोबरच वाहतुकीस अडथळा होणार नाही याची देखील खबरदारी घेण्यात आली होती. पर्यावरणाची काळजी घेत निर्माल्य निर्माल्यकलशांची देखील व्यवस्था करण्यात आली होती. खामकरवाडी खदान,मोरवाली कुंड,कैलाश नगर खदान,शिवमंदिर कुंड,पालेगाव या ठिकाणी विसर्जनासाठी अंबरनाथ नगरपरिषदेच्यावतीने सबंधित यंत्रणांसह नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर यांनी परिसरांतील विसर्जनस्थळांवर स्वत: उपस्थित राहून पाहणी केली. अंबरनाथमध्ये १० दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत विसर्जन पार पडले. यावेळी अंबरनाथ नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.


Post a Comment

0 Comments