मेहकर - आग्या मोहोळाच्या हल्ल्यात तालुक्यातील सोनाटी येथील एका शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. प्रमोद दत्तात्रय बदर (वय ३७) रा. सोनाटी असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
सोनाटी येथील प्रमोद दत्तात्रय बदर (वय ३७) हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे खासगी संस्थेत शिक्षक होते. दिवाळी सुट्टीत ते सोनाटी येथे आलेले होते. २३ नोव्हेंबरच्या दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ते आईसोबत गवंढाळा रस्त्यावरील शेतात गेले होते. त्यांची आई तुरीच्या शेंगा तोडत होती तर प्रमोद हे आंब्याच्या झाडाखाली बसले होते. त्यांच झाडावर आग्या मोहोळ होते.
दरम्यान अचानक झाडावरील माकडाच्या उड्यांमुळे मधमाशांचे मोहोळ प्रमोद यांच्या अंगावर पडले. हजारो माशांनी त्यांना कडकडून चावे घेतल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांच्या आईने आरडाओरडा केला, मात्र कोणीच धावून आले नाही. शेवटी आई रस्त्यावर धावत आली. प्रमोद यांच्या भावाला फोन करून बोलावून घेतले.
जखमी प्रमोद बदर यांना उपचारासाठी मेहकरला नेत असताना रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिक्षकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. फांदीसह मोहळ अंगावर पडल्याने सदरी दुर्घटना घडली.
सोनाटी येथे राहत असलेले प्रमोद दत्तात्रय बदर हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील अप्पा स्वामी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.
प्रमोद हे आपल्या आई सोबत गुरुवारी शेतात पीक पाहण्यासाठी गेले होते. शेतातील पीकला पाणी दिल्यानंतर ते आंब्याच्या झाडा खाली बसून होते. दरम्यान तुरीच्या शेतात आंब्याच्या झाडावर काही माकडे धुमाकुळ घालत असताना सदर शिक्षकांनी दगड मारून माकडांना पळविले.
मात्र माकडाने उडी घेताच, फांदीसह मोहळ खाली असलेल्या शिक्षकांच्या अंगावर पडले. यातच शिक्षक प्रमोद बदर यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे परिसरात शोकाकळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments