-->

Ads

झालं का फिरुन? बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं; परिक्षेला जाते सांगून बाईकवर रोमान्स, VIDEO व्हायरल

 

सध्या बहुतेकांचे विवाहबाह्य संबंध असतात आणि जोडीदारासमोर याचा पर्दाफाश होताच काय होऊ शकतं, याची कल्पनाही करू शकत नाही. जगभरात लग्न, प्रेम, अफेअर या गोष्टींच्या अनेक विचित्र, धक्कादायक घटना समोर येतात. अनेकदा लग्न झालेल्या महिला किंवा पुरुष यांचं बाहेर अफेअर असतं. काही वेळा तर त्यांना रंगेहाथ पकडलं जातं. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये नवऱ्यानं बायकोला आपल्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवऱ्यानं त्याच्या बायकोला दुसऱ्या तरुणासोबत बाईकवर फिरताना रंगेहात पकडलं आहे. यानंतर तो तिला चांगलंच सुनावत आहे. परिक्षेला जाते सांगून त्याची बायको घरातून निघाली होती, मात्र पतीला संशय आल्यामुळे त्याने तिचा पाठलाग केला. यावेळी त्यानं पत्नीला दुसऱ्या अनोळखी तरुणासोबत बाईकवर पकडलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पती पत्नीला मारतही आहे, तसेच तिच्या प्रियकरालाही जाब विचारत आहे. पत्नी मात्र तो माझा मित्र आहे असं वारंवार पतीला सांगण्याचा प्रयत्न करतेय. मात्र पती काहीही ऐकू घेत नाही.

ही भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी लाईक केलं असून हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.







Post a Comment

0 Comments