-->

Ads

लाच घेतल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील लेखापालाला अटक

प्रतिनिधी रेखा भेगडे :तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेतील लेखापाल यांनी ठेकेदाराचे प्रलंबित बिल काढण्यासाठी बिलाच्या 1टक्के लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी दिनांक 27सप्टेंबर सायंकाळी 6 वाजता तळेगाव दाभाडे ता. मावळ, जि. पुणे येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने केली आहे.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गु. र. न.512/2023 गुन्हा दाखल केला आहे. दोन वर्ष होत आलेले असून लोकप्रतिनिधी नसल्याने नगरपरिषद कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. टक्केवारी घेतल्याशिवाय ठेकेदारांची बिले काढली जात नाही. मार्च 23ची बिले सप्टेंबर मध्ये देखील दिली जात नाही. त्यातच ठेकेदार व्याजाने पैसे काढून कामे करतात त्यांना वेळेत बिल दिले जात नाही तर निधी नसल्याचे सांगत बिल दिले जात नाही. टक्केवारी देणाऱ्या ठेकेदाराला घरपोच बिल दिले जाते.

बिल घेण्यासाठी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत थांबले तरी बिल दिले जात नाही. सर्वच ठेकेदार त्रस्त झाले असून त्रस्त झालेल्या ठेकेदार तक्रारदार यांनी अखेर अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागात पकडून दिले.


नरेंद्र अनंतराव कणसे (वय -55, रा. तळेगाव दाभाडे )लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या लेखापाल (वर्ग -3) अधिकाऱ्याचे नाव आहे.पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार ठेकेदार तळेगाव दाभाडे नगरपरिषद स्मशानभूमी मध्ये गॅस शव दाहिनी चा ठेका मिळालेला आहे. तसेच कोविड च्या काळात नगरपरिषद हद्दीत सॅनिटाझिर फवारणीचा ठेका त्यांना मिळाला होता. सानिटीझर फवारणी केल्याचे बिल अध्यापही तक्रारदार ठेकेदार यांना आरोपी लेखापाल नरेंद्र कणसे यांनी दिले नाही. सदर बिल काढण्यासाठी व मागील बिल काढण्यासाठी एक टक्क्याप्रमाणे लाच रकमेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार ठेकेदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता, लेखापाल नरेंद्र कणसे यांनी तक्रारदार यांचेकडे कोविड काळात सॅनिटायझर ची फवारणी केल्याचे बिल मंजूर करण्यासाठी लेखापाल नरेंद्र कणसे यांनी तक्रारदार यांचेकडे बिलाच्या एक टक्के रकमेच्या लाचेची मागणी केली होती. दि.22/8/2023,  23/9/2023, 1/9/2023, 13/9/2023,  व 14/9/2023 या तारखाना लाचेची मागणी केली. त्याची खात्रीपूर्वक तपासणी करून तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवार( दिनांक -27)सायंकाळी रकमेच्या एक टक्के 5000 रु. ची लाच घेताना रंगेहात अटक केली. आरोपी लेखापाल नरेंद्र कणसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहे.
Post a Comment

0 Comments