प्रतिनिधी रेखा भेगडे :आज दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे जिल्हा आयुक्त श्री.सौरभजी राव व जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विधानभवन येथे श्री क्षेत्र भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक संपन्न झाली.
मा.आयुक्तांनी यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे :
🚩श्री क्षेत्र भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करा. आपण सर्वे मिळून अप्रतिम काम इथे करू.
🚩तीर्थक्षेत्राचा विकास करताना भाविकांना व स्थानिक नागरिकांना दर्जेदार व पायाभूत सुविधा मिळाव्यात,याचे खात्री करा.
🚩मावळ /खेड कृषी व महसूल विभागाच्या ताब्यात असलेली गायरान जागे संदर्भात बैठक घ्यावी
🚩परिक्रमा मार्गावर असणाऱ्या वनविभागाच्या जागे संदर्भात प्रस्ताव सादर करावा
🚩मुख्य मंदिर,रस्ते,पाणी पुरवठा या पायाभूत सुविधांची पहिल्या टप्प्यात कामे सुरू करावी.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.किरण इंदलकर,विश्वस्त साहेबराव काशीद,श्री.गजानन शेलार,श्री दिलीप ढोरे,मंदिर आर्किटेकट श्री सोनपुरा आदी उपस्थित होते
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेDevendra FadnavisChandrashekhar BawankuleChandrakant Patil
0 Comments