ही घटना साधारण दुपारच्या वेळेत साकीनाका भागात घडली.
मुंबई, 20 जून : महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवारच्या हत्येनंतर मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.
धावत्या रिक्षेतून एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचा गळा चिरून हत्या केल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीचं नाव दीपक बोरसे असून गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला.
मृत तरुणीचं नाव पंचशीला अशोक जामदार असून ती चांदिवली येथील संघर्ष नगर येथे राहत होती. रिक्षेत बसलेले असता काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर तरुणीने पंचशीलाचा गळा चिरला. ही घटना साधारण दुपारच्या वेळेत साकीनाका भागात घडली.
धावत्या रिक्षेत तरुणीचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला. यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी ती रिक्षेच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र फार लांब जाऊ शकली नाही. यानंतर तरुणाने स्वत:च्या मानेवरही सुरा फिरवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पादचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर दोघांनाही जवळील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र पंचशीलाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याविरोधात आयपीसी 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments