-->

Ads

योग्य उपचारांअभावी प्राची आगेडकरचे खेळाडू होण्याचे स्वप्न मातीमोल मुखमंत्री साहेब सरकारी रुग्णालयांकडे जातीने लक्ष द्या


आगेडकर कुटुंबियांचे सरकारला साकडे 

सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी योग्य त्या  उपायोजना कराव्यात - निलेश सांबरे 

ठाणे :  गोर गारीब असलेल्या अनेक रुग्णांना सरकारी रुग्णालये ही एक मोठा आधार असतात . मात्र सरकारी रुग्णालयाची दुरावस्था हा तर ऐरणीवरचा मुद्दा झाला आहे.  या रुग्णालयात मिळणारी सेवा पाहता भिक नको पण कुत्रं आवर अशी असते . कित्येकदा तर मरण येत नाही म्हणून खितपत जगायचं एवढी हतबलता त्या रुग्णाच्या वाट्याला येत असते . आणि उमेदीच्या वयात जर एखादा आजार अथवा अपघात झाला तर एखाद्या गरीब रुग्णाची आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आयुष्याची वाताहात होते,  स्वप्नांची राखरांगोळी होते . असेच काहीसे घडले आहे प्राची आगेडकर आणि तिच्या कुटुंबियांच्या बाबतीत.

ठाण्यातील सावरकर नगर येथे राहणा-या प्राची आगेडकर या २३ वर्षीय मुलीचा १० वीत असताना पाच सहा  वर्षापूर्वी  शाळेत कबड्डी खेळताना एक अपघात झाला होता . तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.  मात्र काही काळानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा एकादा तिला जास्त त्रास होवू लागला . त्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिचा MRI काढला तेव्हा त्यात तिच्या पायाच्या लीगामेंटला गंभीर दुखापत झाल्यचे सांगण्यात आले . त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी  त्यांना ३० – ४० हजार रुपये  अपेक्षित खर्च सांगण्यात आला. ८ फेब्रुवारी २०२३ या तारखेला शस्त्रक्रिया  करण्यासाठीची वेळ देण्यात आली होती. मात्र त्यानंतर रुग्णालयाच्या दुरुस्तीचे कारण देत ऑपरेशनची तारीख पुढे ढकलण्यात आली . त्यानंतर १६ मार्च ही तारीख देण्यात आली .  त्या ठीकाणी भूलचे  इंजेक्शन देऊन शास्त्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आले मात्र यावेळी निकीट नावाचे बेल्ट  साहित्य जे या उपचारादरम्यान वापरले जाते ते यावेळी तुटले .  दुसरा नवीन नि कीटबेल्ट (पट्टा) न वापरता तोच बेल्ट पुन्हा चिकटपट्टी लावून वापरण्यात आला. त्यांनंतर काही कारणास्तव  त्या शस्त्रक्रियेसाठी त्या रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगत भूल असतनाच शस्त्रक्रिया न करताच तिला डिस्चार्ज देण्यात आला. झालेल्या प्रकाराबाबत रुग्णाच्या कुटुंबियांची रुग्णालयातील व्यवस्थापनाकडून माफी देखील मागण्यात आली. नंतर त्या रुग्णाला  ठाण्यातील सिद्धीविनायक रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला . सुरुवातीला येथील खर्च हा ८० हजार होईल असे सांगण्यात आले . नंतर ऑपरेशन सुरु असताना पायाची एक नस फाटली असून अजून  एक लाख खर्च होईल असे सांगण्यात आले.  आपल्या रुग्णाचा पाय वाचावा म्हणून त्यांनी कसेतरी हे पैसे जमवले . प्राचीचे वडिल हे साधे  नोकरदार आहेत त्यांनी पै पै जमा केलेली सगळी रक्कम आणि घरातील असलेले दागिने विकून तसेच थोडेफार उसनवारी घेऊन  ही रक्कम हॉस्पिटलला अदा केली . जिजाऊ संस्थेने देखील या दरम्यान या कुटुंबाला आर्थिक सहकार्य केले होते.

मुलीचा उपचाराचा खर्च तर केला मात्र आता आगेडकर कुटुंबीयासमोर कुटुंब चालवायचे कसे हा प्रश्न  उभा राहिला आहे . जर का सरकारी रुग्णालयात या सुविधा असत्या तर या कुटुंबीयांवर अशी वेळ आली नसती . मुख्यमंत्री महोदयांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष  द्यावे अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे. 

तर या घटनेबद्दल जिजाऊ सामाजिक संस्थेने ठाणे महापलिकेच्या आरोग्य सुविधेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून ठाणे सारख्या शहरात जर अश्या घटना घडत असतील तर ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असून याकडे मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्तीश: लक्ष घालून येथील सर्वसामान्य जनतेला योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात . त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी योग्य त्या उपायोजना कराव्यात अशी मागणी देखील जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments