-->

Ads

फडणवीसांनी दुर्लक्ष केलं, संजय राऊत यांनी थेट CBIकडे केली तक्रार

 

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने आता सीबीआयकडे तक्रार करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.












    मुंबई, 25 एप्रिल : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील 500 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केलीय. राऊत यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की,"राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे मी सीबीआयकडे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील 500 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी तक्रार दाखल केली आहे, आता पुढे काय होते ते पाहूया"

    दरम्यान, संजय राऊत बुधवारी वरवंड इथं जाहीर सभा घेणार असून भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील मनी लाँडरिंग प्रकरणावर ते बोलणार आहेत. संजय राऊत या सभेत काय बोलणार? कोणाचा पर्दाफाश करणार? याची उत्सुकता दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात शिगेला पोहोचली आहे. वरवंड येथे नागनाथ विद्यालयाच्या ग्राउंडवर बुधवारी सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे. संजय राऊत यांच्या सभेबाबत माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी माहिती दिली. संजय राऊत यांच्याशिवाय या सभेसाठी उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार रवींद्र धंगेकर हेसुद्धा असणार आहेत.


    काय आहे प्रकरण?

    संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी ईडी, आयकर विभाग आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करत आमदार कुल यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. 2016 पासून भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात लेखापरीक्षण अहवालामध्ये ठेवण्यात ठपका ठेवण्यात आला होता. तारण न देता कर्जे उचलण्यात आली. सरकारकडून 25 कोटी रुपये अनुदान घेऊन देखील सलग तीन वर्षे ऊस गळीत हंगाम बंद ठेवला. कारखान्यावर बँकांची 180 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी भरण्यासाठी एकरकमी कर्जपरतफेड योजनेचा लाभ घेण्यात कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला अपयश आले इत्यादी आरोप करण्यात आले होते.

    Post a Comment

    0 Comments