-->

Ads

संजय राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस; राणेंच्या अडचणी वाढणार?

 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते मंत्री नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.





    मुंबई, 3 फेब्रुवारी :  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते मंत्री नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नारायण राणे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजपच्या नादाला लागून राणे खोटं बोलत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राणे यांना सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांनीच पद दिलं होतं, याचं भान त्यांनी राखाव असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं? 

    शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे.  औरंगाबाद आणि नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर अमरावतीमध्ये देखील मविआचे उमेदवार आघाडीवर आहेत. यावरून राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी भाजपला नाकारल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच  महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रत्येक निवडणूक एकीने लढत आहोत, असही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
    संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राणे भाजपच्या नादाला लागून खोटं बोलत आहेत. राणेंचे दावे हास्यपद आहेत. राणेंना नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांना कोर्टात उत्तर द्यावं लागेल. राणे यांना सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांनीच पद दिलं होतं, याचं भान त्यांनी राखावं. आमचं नाण खणखणीत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    Post a Comment

    0 Comments