-->

Ads

सासरच्या मंडळींकडून छळ, तर मानसिक विकलांग मुलाचीही काळजी, महिलेचा भयानक निर्णय

 श्रीधरने 2013मध्ये सर्पवरमच्या रमा वेंकट लक्ष्मी गणपथू स्वातीशी लग्न केलं होतं.



    तेलंगणा, 17 जानेवारी : तेलंगणात 36 वर्षांच्या एका विवाहित महिलेने इमारतीच्या 22व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आपल्या सात वर्षांच्या मानसिक विकलांग मुलाची काळजी घेण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींचं मन वळवू न शकल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. हैदराबादमधल्या कुकटपल्ली हाउसिंग बोर्ड (केपीएचबी) कॉलनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

    या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना सर्कल इन्स्पेक्टर बी. किशन कुमार यांनी सांगितलं, की आंध्र प्रदेशातल्या काकीनाडामधल्या समरलाकोटाचा मूळ रहिवासी असलेल्या श्रीधरने 2013मध्ये सर्पवरमच्या रमा वेंकट लक्ष्मी गणपथू स्वातीशी लग्न केलं होतं. श्रीधर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत काम करतो. हे जोडपं केपीएचबी कॉलनी पोलीस स्टेशन हद्दीतल्या 'मंजिरा मॅजेस्टिक होम्स'मध्ये राहत होतं. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला; पण तो मानसिकदृष्ट्या विकलांग होता. सध्या हा मुलगा सात वर्षांचा आहे.

    स्वातीचा पती श्रीधर आणि त्याचे आई-वडील या मुलाचं संगोपन स्वतः करण्याऐवजी त्याला शहरातल्या एखाद्या अनाथाश्रमामध्ये ठेवू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी स्वातीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. स्वातीने त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. स्वातीने आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडून आर्थिक मदत घेतली. ही गोष्ट सहन न झाल्याने स्वातीचा पती आणि सासरच्यांनी तिचा आणखी छळ सुरू केला. यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.


    रविवारी (15 जानेवारी) संपूर्ण अपार्टमेंटमधले रहिवासी संक्रांतीचा सण साजरा करत असताना, रात्री 9.30 वाजता स्वाती इमारतीच्या 23व्या मजल्यावर पोहोचली. तिथून ती 22व्या मजल्यावर आली आणि तिथून तिने खाली उडी मारली. अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये ती येऊन पडली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं स्वातीचा तात्काळ मृत्यू झाला.


    "लग्नानंतर तीन वर्षांनी स्वातीने एका मुलाला जन्म दिला. हा मुलगा मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. माझा मेहुणा श्रीधर आणि त्याचे आई-वडील तीन वर्षांपर्यंत या मुलाला भेटायला आले नाही. त्यांनी स्वातीवर या मुलाला दुसरीकडे सोडून आणि दुसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी दबाव टाकला. यामुळे आम्ही श्रीधरविरुद्ध तक्रारही दाखल केली होती. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हा त्याने त्यांना आश्वासन दिलं, की भविष्यात तो स्वाती आणि तिच्या मुलाला कोणताही त्रास देणार नाही.

    मी रविवारी माझ्या बहिणीला सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता तिचा फोन बंद होता. नंतर, श्रीधरने फोन करून माझ्या बहिणीला दुखापत झाल्याची माहिती दिली; मात्र तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला तिचा मृतदेहच दिसला," अशी माहिती स्वातीचे बंधू हेमंत यांनी दिली. स्वातीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा पती, सासू-सासरे, पतीची बहीण आणि पतीच्या बहिणीचा पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    Post a Comment

    0 Comments