-->

Ads

अपहरण झालेल्या चिमुकलीला लागला अपहरणकर्त्या दाम्पत्याचा लळा, कारण ऐकून पोलीसही गहिवरले

 

जान्हवी आणि मनोजचे लग्न होऊन पाच वर्षे झाली होती मात्र मुलबाळ नव्हते. अपहरण करण्याचा कोणताही उद्देश या दोघांचा नव्हता केवळ...




    अंबरनाथ, 01 जून : अपहरणाचा (Kidnapping) कोणताही उद्देश नसतांना केवळ मायेपोटी एका दाम्पत्याकडून नकळत 3 वर्षाच्या मुलीचे (3 old girl Kidnap) अपहरण झाले. मात्र आश्चर्य म्हणजे या अपहरणकर्त्या दाम्पत्याचा या मुलीला चक्क लळाच लागला. अंबरनाथ स्टेशन (Ambernath station) परिसरात हा सगळा प्रकार घडला. शिवाजीनगर पोलिसांनी या दाम्पत्याला शोधून मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षाची आराधना ही चिमुरडीचं ३० मे रोजी दुपारी अंबरनाथ स्टेशन परिसर खेळत होती. अनवाणी आणि एकटीच असल्याने तिथे रानमेवा विकणाऱ्या जान्हवी आणि मनोज या दाम्पत्याला  ती दिसली. तिला भूक लागल्याने त्यांनी दिला वडापाव खाऊ घातला. तिच्यासोबत कोणीच नसल्याचे पाहून अखेर या दाम्पत्याने तिला लोकलने कर्जतला आपल्या घरी नेले त्या आधी तिला नवे कापडे देखील घेतले.


    अखेर दुसऱ्या दिवशी या पोलिसांनी  स्टेशन परिसरात जाऊन तिथे भाजी विकणाऱ्या लोकांकडून माहिती गोळा करत अपहरण झालेली मुलगी स्टेशन परिसरात रानमेवा विकणाऱ्या आणि कर्जत येथे राहणाऱ्या दांपत्याकडे असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी टीम रवाना करून या मुलीला सुखरूप आणलं आणि तिच्या आईच्या स्वाधीन केलं. ज्या महिलेने पोलिसांना ही माहिती दिली त्या विमल वाघमारे यांचा पोलिसांनी सत्कार केला. दरम्यान आशा प्रकारची ही पहिलीच घटना पोलिसांनी पाहिली आणि अनुभवली असेल.

    आराधनाच्या आई विकी मुर्गेश ही अंबरनाथ नगरपालिकेत सफाई कामगार आहे. त्यामुळे शेजाऱ्यांकडे आराधनाला ठेऊन ती कामावर जाते. त्या एकटेपणामुळे कदाचित अपहरणकर्त्यांचा आराधनाला लळा लागला असावा. शिवाय जान्हवी आणि मनोजचे लग्न होऊन पाच वर्षे झाली होती मात्र मुलबाळ नव्हते. अपहरण करण्याचा कोणताही उद्देश या दोघांचा नव्हता केवळ प्रेमापोटी आणि मुलगी अनवाणी आणि भुकेली असल्याने त्यांना मुलीची दया आल्याने त्यांच्याकडून नकळत हे कृत्य घडले. आता मुलगी मिळाल्याने मुलीची विकी मुर्गेश आनंदात आहे.

    इकडे आराधनाची आई कामावरुन घरी आल्यावर शोधाशोध करून देखील तिला आराधना दिसली नाही. तिने अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करत चार पथके या मुलीच्या शोधासाठी रवाना केली. स्वतः डी सी पी, ए सी पी आणि सीनियर पी आय रात्री उशिरापर्यंत या मुलीच्या शोधासाठी प्रयत्न करत होते.

    Post a Comment

    0 Comments