-->

Ads

नराधम बापाचं मुलीसोबत धक्कादायक कृत्य, न्यायालयाने 14 दिवसात सुनावली जन्मठेपेची शिक्षा

 उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे एका मुलीसोबत एक धक्कादायक घटना घडली होती. (Physical abuse on daughter) या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी न्यायालयाने फक्त 14 दिवसातच निकाल दिला आहे आणि आरोपी पित्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील बलात्काराच्या आरोपी वडिलांना न्यायालयाने अवघ्या 14 दिवसांत जन्मठेपेची (life imprisonment to father) शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपी वडिलांना 53 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विशेष (POCSO कायदा I) अवधेश कुमार यांच्या न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल झाल्यापासून 6 दिवसांच्या आत शिक्षा सुनावण्यात आलेले हे राज्यातील पहिले प्रकरण आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील डिडोली भागातील गावात राहणाऱ्या तरुणाने 14 जूनच्या रात्री डिडोली पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दाखल केली होती. या नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. सात महिन्यांपासून तो तिच्यावर सतत बलात्कार करत होता. दर पीडित मुलगी गर्भवती झाल्यावर ही धक्कादायक माहिती समोर आली.

अल्ट्रासाऊंडद्वारे पीडित सात महिन्यांची गर्भवती असल्याचे निश्चित झाले. आरोपी नराधम 50 वर्षीय व्यक्ती हा वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करायचा. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले होते की, जेव्हा जेव्हा घरातील सदस्य घराबाहेर असतात तेव्हाच तो आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा. तसेच कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तो देत होता.


आरोपी वडिलांविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून 15 जूनला त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी पाच दिवसातच आरोपपत्र दाखल केले. यानंतर 23 जूनला न्यायालयात सुनावणी सुरू झाली. मंगळवारी सहाव्या दिवशी विशेष न्यायाधीश (POCSO कायदा I) अवधेश कुमार सिंह यांनी आरोपी नराधम बापाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याला 53 हजारांचा दंडही सुनावण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments