अमरावतीतील प्रकार खपवून घेतला जाणार नाही - एकनाथ शिंदे
मनमाड - एकनाथ शिंदे आज मनमाड येथे एका खाजगी कार्यक्रमाला आले असता यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की ... खारघर उड्डाणपुला संदर्भात जो श्रेय वाद चालू असून आनंद परांजपे यांनी अशी टीका केली आहे की बापाची चप्पल मुलाने घातली म्हणजे तो बाप होत नाही.. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की ...आनंद परांजपे यांच्या बोलण्यावर मला आवश्यकता वाटत नाही कारण त्यांचे वडील प्रकाश परांजपे होते यांना शिवसेनेने जो मान सन्मान दिला त्यांनी त्यांची चप्पल घालून त्यांनी कसे काम करायला पाहिजे होते मात्र त्यांना ते काही जमलं नाही. स्वतःचं आत्मचिंतन आनंद परांजपे यांनी करायला पाहिजे....
अमरावती येथे शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या संदर्भात नवनीत राणा कुटुंबीयांना नजरकैदेत केले या संदर्भात शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की..... छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत असा कुठलाही प्रकार खपवून घेणार नसून या सर्व घटनेची शहानिशा करून गृहविभाग पुढील कारवाई करेल.
0 Comments