कार्यक्रमात मंगला दैठणकर, रमाकांत कुलकर्णी, प्रमोद झिंजाडे, दत्ताभाऊ बारगजे, कलिंदीताई पाटील, भूमिपुत्र वाघ, रमेश भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अतुल मादावार आदींना सामाजिक कार्यगौरव पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. अतुल लताताई राम मादावार यांचे विविध संस्थेच्या माध्यमातून मागील 21 वर्षापासून सेवाभावी कार्य सुरु आहे. जिव्हाळा संस्थेचे प्रेरणास्थान पाणीदार माणूस, जलतज्ञ स्व. मधुकरजी धस, स्व, बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, सिंधूताई सपकाळ, डॉ. राणी बंग, डॉ. गिरीश कुलकर्णी व अंशू गुप्ता यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन संस्थे ची स्थापना करण्यात येऊन संस्थेने अनेक वंचित, उपेक्षित घटकांसाठी लोकोपयोगी कार्य केले आहेत. सेवाभावी कार्याची दखल मराठवाडा लोकविकास मंच, महाराष्ट्र यांनी घेऊन अतुल मादावार आणि संगीताताई अतुल मादावार यांना मोठ्या दिमाखदार सोहळ्यात माजी अध्यक्ष अफार्म संस्था, पुणे एन. एन. कोंढाळकर अफार्म पुणे, अध्यक्ष मराठवाडा लोक विकास मंच, महाराष्ट्र विश्नाथ अन्ना तोडकर यांच्या हस्ते मानचिन्ह, मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन पुरस्कार प्रदान केला आहे. याबद्दल परिसरातून सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चौकट मराठवाडा लोकविकास मंच, महाराष्ट्र यांच्या वतीने जिव्हाळास संस्थे च्या कार्याची दखल घेऊन आम्हाला “मधुकर धस स्मृती गौरव पुरस्काराने” हा पुरस्कार गुरु च्या नावे शिष्याला सन्मानित केले त्या बद्दल मराठवाडा लोकविकास मंच, महाराष्ट्र चे शतशः आभार. जिव्हाळा संस्थे चे दैवत पाणीदार माणूस जल तज्ञ मधुकर धस यांच्या मार्गदर्शना प्रमाणे जिव्हाळा संस्था महिला सक्षमीकरण, महिला व बालविकास वंचित, उपेक्षित घटकांसाठी अविरत सेवाभावी कार्य करू.
अतुल लताताई राम मादावार
अध्यक्ष –जिव्हाळा संस्था

0 Comments