-->

Ads

दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी शेख अनिस चुरशीच्या लढतीत बहुमताने विजय

येथील जि. प.उच्च प्राथमिक उर्दू शाळेच्या अध्यक्ष पदी येथील पत्रकार शेख अनिस शेख अब्दुल रहेमान यांना बहुमतांनी विजय मिळाला असून त्यांची पुढील दोन शैक्षणिक वर्षा साठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

खाद्या ग्राम पंचायत निवडणुकांना शोभावा अशा वातावरणात येथील जि. प.उच्च प्राथमिक उर्दू शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती च्या निवडणुका काल पार पडल्या

अतिशय चुरशी च्या व ओढाताण या निवडणुकात पहावयास मिळाली.4 डिसेंबर रोजी सर्व पालक वर्गातून शाळा समिती च्या सदस्य निवड प्रकिया पार पडली ज्या मध्ये 7 महिला पालक सदस्य व 6 पुरुष सदस्य निवड करण्यात आली.तर काल 7 डिसेंबर रोजी या 13 सदस्यां मधून अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.अध्यक्ष पदाला गावातील काही मंडळींनी प्रतिष्ठेचा विषय केल्याने त्यात फुलसावंगी चे चांगलेच राजकीय वातावरण ढवळून निघाले.अक्षरशः सदस्य फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

शेवटी 7 डिसेंबर रोजी सकाळी साडे 11 वाजता अध्यक्ष पदा साठी मतदान करण्यात आले ज्या मध्ये 8 मतदान घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शेख अनिस अध्यक्ष पदाच्या निवडीत विजय घोषित करण्यात आले व साजिदा शेख अय्युब ह्या महिला सदस्य उपाध्यक्ष पदी बहुमतांनी विजय झाल्या आहेत.ही निवडणूक आशा वेळी झाली आहे ज्या वेळी ही शाळा कमी शिक्षक,वॉल कपोन्ड नसल्याने सर्वत्र पसरलेली अस्वच्छता ,

नशाधीन व्यक्तींचे मुक्त संचार आशा विविध समस्याना तोंड देत आहे.नवीन बॉडी ह्या समस्या वर कश्या प्रकारे मात करते ह्या कडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहे.

यावेळी बाबू खान,अब्दुल रहेमान खान, नसीम नाज समीर नवाब, रेश्मा मुनिरोदिन,सुलताना नसीम खान,अंजुम परवीन शेख अन्सार ,मोहसीन खान,शेख जमन, नवशेर खान,नसरीन खान, तलद खान हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments