-->

Ads

सोशल मीडियावर झालं प्रेम; वकीलाने घरी बोलावून युवतीवर अनेकदा केला बलात्कार

 एका 26 वर्षीय युवतीला लग्नाचं आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक (Arrest) केली आहे.


    ग्वालियर, 5 एप्रिल : एका 26 वर्षीय युवतीला लग्नाचं आमिष (Pretext of marriage) दाखवून अनेक वेळा बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक (Arrest) केली आहे. आरोपी युवक हा पेशाने वकील असून त्याने पीडित युवतीला लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला. पण पीडितेनं लग्नासाठी विचारणा केली असता त्याने तिच्याशी वाद घालून संबंध तोडले. त्यामुळे पीडित युवतीनं आरोपी वकीलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

    संबंधित घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील आहे. ग्वालियर जिल्ह्यातील मुरारजवळील गुलाबपुरी येथील रहिवासी असणाऱ्या 26 वर्षीय युवतीचं गेल्या पाच वर्षांपासून आरोपीनं लैंगिक शोषण केलं आहे. त्या दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. दरम्यानच्या काळात आरोपी युवकानं पीडितेला घरी बोलावून अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु जेव्हा पीडितेनं लग्नासाठी हट्ट धरला तेव्हा दोघांच्या संबंधात अंतर आलं आणि त्यांची मैत्री तुटली.

    आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेमात धोका मिळाल्यानंतर पीडित तरुणीने हजीरा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपी तरुणाला अटक करून तुरुंगात धाडलं आहे. आरोपी तरुण हा वकिल असून त्याने पीडित युवतीला लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. संबंधासाठी नकार दिला असता आरोपी तरुणाने तिला बदनाम करण्याची धमकीही अनेकदा दिली.

    याबाबत पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, गेल्या पाच वर्षांपासून ती आरोपी तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याने लग्नाचं वचन देऊन अनेकदा शारिरीक संबंध ठेवले. पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरू केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

    Post a Comment

    1 Comments

    1. Mulila Kay ghai hoti pahile lagan hou dyayacha na mag
      Mag sabadh thevayach

      ReplyDelete