एवढ्यावरच ते नराधम थांबले नाहीत तर त्यांनी तिला मारहाणही केली त्यात पीडित युवती गंभीर जखमी झाली.
गुरुग्राम 04 ऑक्टोबर: हाथरसच्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळलेली असतानाच हरियाणातल्या गुरुग्राममध्येही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार युवकांनी एका तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून उपचारही सुरू आहेत. घटनेनंतर अटक करण्यात आलेले आरोपी हे Zomato आणि Swiggyचे डिलिव्हरी बॉय असल्याचं स्पष्ट झालं आहे.
गुरुग्रामच्या पॉश समजल्या जाणाऱ्या DLF फेज-2मध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. पंकज, पवन, रंजन आणि गोविंद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुग्राम पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या चौघांनाही अटक केली आहे. गुरुग्रामच्या DLF फेज-2 भागात आरोपींपैकी एक तरूण राहात होता. त्याने आपल्या खोलीवर या तरुणीला बोलावलं होतं. त्यानंतर त्याचे तीन मित्रही तिथे आले. त्या चौघांनीही तिच्यावर अत्याचार केला.
एवढ्यावरच ते नराधम थांबले नाहीत तर त्यांनी तिला मारहाणही केली त्यात पीडित युवती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर युवतीला रात्री अडीच वाजताच्या सुमारास गंभीर अवस्थेत दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. नंतर पोलिसांनी तिला गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. अशातच भाजपचे एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक आणि संतापजनक विधान भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे.
सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार आहे. हाथरस प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुक्तफळं उधळली.
'रामराज्य सुरू आहे, पण अशाही रामराज्यात बलात्काराच्या घटना घडत आहे असा सवाल सुरेंद्र सिंह यांना विचारण्यात आला होता, त्यावर सिंह म्हणाले की, 'मी आमदार तर आहेच, पण एक शिक्षक आहे. अशा घटना या संस्कारामुळे थांबू शकतील, त्या काही सरकार किंवा तलवारीमुळे थांबणार नाही. प्रत्येक आई-वडिलांचा धर्म आहे की, आपले बोलणे आणि आपल्या मुलींना चांगला संस्कारी वातावरणात राहण्याचा, चालण्याचा आणि शालीन व्यवहार शिकवण्याची गरज आहे. '

0 Comments