-->

Ads

आज अंबरनाथ पूर्व भागातील हुतात्मा चौक येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला

गेले बरेच दिवस आपले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस प्रशासन सातत्याने कोरोना सारख्या संकटावर एकत्रितपणे लढा देत आहे आणि अंबरनाथचा रिकव्हरी रेट ९०℅ हुन आधीक झाला आहे. याचे संपूर्ण श्रेय आपले पालकमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदारसाहेब डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांना जाते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदशनामुळे अंबरनाथ शहरप्रमुख मा. श्री. अरविंद वाळेकर साहेब तसेच अंबरनाथ शहराच्या मा. नगराध्यक्षा सौ. मनिषा वाळेकर तसेच वैद्यकीय विभागाचे अधिकारी, डॉक्टर वर्ग, पोलीस प्रशासन या सर्वांचे अथक प्रयत्न तसेच वेळोवेळी गरज पडेल तेव्हा आपले सर्व नगरसेवक,शिवसैनिक व नागरिक यांनी देखील मदतीचा हात पुढे करून या लढ्यात आपल्याला सहकार्य केले आहे.




डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या विद्यमाने अंबरनाथ शहरातील कोरोना परिस्थिती सहजपणे हाताळण्यासाठी पाच साधारण व एक कार्डियक अँबुलन्स अंबरनाथ पालिकेला भेट स्वरूपात देण्यात आली, याचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पूर्वेकडील हुतात्मा चौकात पार पडला, शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर व माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सध्या महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया चालू असून उद्योग बाजार व काही प्रमाणात वाहतूक सेवा सुरू झाली आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे, म्हणून अश्या परिस्थितीला सहजपणे हाताळता यावे म्हणून विशेषकरून अंबरनाथ शहराला गरजेनुसार सदर अँबुलन्स देण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला व आज त्या अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी अंबरनाथकारांना आपली काळजी घेण्याची व कोरोनाची चाचणी करून वेळीच उपचार करण्याचे आवाहन केले.



अशीच एक लोकहिताची कामगिरी म्हणून आपले शहरप्रमुख मा. अरविंद वाळेकर यांच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करून आज Dr. Shrikant Shinde foundation तर्फे अंबरनाथसाठी ५ रुग्णवाहिका आणि १ कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात आल्या. या सोहळ्यासाठी आपले खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, शहरप्रमुख मा. अरविंद वाळेकर, मा.नगराध्यक्षा सौ. मनिषा वाळेकर तसेच अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. रसाळ साहेब तसेच विजय पवार, डॉ.महेश्वरी, डॉ. राठोड सर्व उपशहरप्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि इतर सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments