-->

Ads

उमरखेड जिगरबाज तरुणाने वाचवले चार महिलेचे प्राण

   जिगरबाज तरुणाने वाचवले चार महिलेचे प्राण 


उमरखेड  ( संजय जाधव उमरखेड ) तालुक्यातील मौजे कुरळी येथे संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला व या पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला होता, संध्याकाळच्या वेळेस शेतातून परतणार्‍या चार महिला  लाकडापासून  बनवलेल्या नावे मध्ये बसून ,

 जिल्हा स्थानिक भाषेत रूख म्हणतात ,तिच्यावर बसून नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. अशा वेळेस ति नाव  उलटली व त्या चारही महिला पुरा च्या पाण्यामध्ये  पडल्या. पलीकडच्या बाजूने संबंधित  गावच्या कोतवालाचा मुलगा विजय भाडंवले व त्याचे मित्र  रामेश्वर पाटील गंगाधर पाटील अविनाश पाटील  भूषण पाटील मनोज खरतडे पूर पाहण्यासाठी गेले होते, ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः  नाल्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारल्या व त्या चारही वाहून जाणार्‍या महिलांना त्यांनी सुरक्षितपणे काठावर आणले त्याच्यावर उमरखेड तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे



Post a Comment

0 Comments