डोंबिवली आजदेपाडा येथील जाणता राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सैनिकांना श्रद्धांजली...
डोंबिवली : आजदेपाडा येथील जाणता राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाच्या आगमनावेळी देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या सैनिकांना भावपूर्ण श्रधांजली वाहिली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवीत असून समाजसेवा हेच मंडळाचे उद्देश असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नंदू परब यांनी यावेळी सांगितले.
सायंकाळी दीनदयाळ रोड येथील गणपती कारखान्यातून जाणता राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तीचे आगमन मिरवणूक सुरु केली होती. मंडळाचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. डोंबिवली पश्चिमेकडील व्दारका हॉटेल जवळ श्री गणरायाछे आगमन होत असताना मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी भारतीय तिरंग्याचे रंग असलेल्या फुग्यांना सैनिकांना आदरांजली वाहणारा कागदी फलक लावून ते फुगे अध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकाऱ्यांनी हवेत सोडले आणि शहीद सैनिकांना मानवंदना देण्यात आली.

0 Comments