-->

Ads

मुंबईमधील बालसुधारगृहात गणेशोत्सवानिमित्त टिटवाळयातील गंधर्व कलाधाराने सादर केला कलाविष्कार
 टिटवाळा येथील कलाकारांनी सामाजिक बांधिलकी जपत डोंगरीसॅण्डसरोड,डोंगरी,मुंबई बालगृह/सुधार गृह, येथे गाण्याच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. समाजापासून दूर  असणाऱ्या ४०० मुला मुलींनी व या मुलांची काळजी घेणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. विशेष करून तेथील मुला व मुलींनी स्वतःहुन विविध  कलाविष्कार दाखवून सर्वांची वाहवा मिळवली.

सदर गाण्याच्या कार्यक्रमात उज्वल धनगर यांच्या निवेदनाने मुलांमध्ये उत्साह निर्माण केला.तर गायक कलाकार शरदजी इंगळे, किरण कांबळेआरोही कदम,नॅन्सी यांनी मुलांना व  कर्मचारी यांना गाण्याच्या ठेकावर नाचायला भाग पाडले.गाण्याचा कार्यक्रम संपल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर असणारे आनंदाचे भाव व पुन्हा परत गाण्याचा कार्यक्रम देण्यासाठी घातलेली गळ विसरण्यासारखी नव्हती अश्या भावना यावेळी गंधर्व कालाधाराचे प्रमोद नांदगावकर यांसह  कलाकारांनी व्यक्त केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल सुधार केंद्राचे कुलकर्णी सरचंदर व गंधर्व चे अतुल शिंपी,ओंकार उबाळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments